माथेरानच्या हात रीक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार केंद्रीय पर्यावरण खात्यातर्फे ई रिक्षा व ई टेम्पोचा पर्याय योग्य असल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र मुंबई कोर्टात श्री अनिल बोकोलिया यांनी टेम्पो च्या सूनवाई दरम्यान सादर केले आहे.
ई रिक्षाची परवानगी मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेने गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे दि 21 ऑक्टोबर ला पहिली सुनावणी झाली पुढील दोन सुनावणीत संघटनेचे वकील ललित मोहन व जॉन्सन सुब्बा यांनी वाहन बंदीच्या पार्श्वभूमीवर ई रिक्षा व ई टेम्पोचे महत्व समजून सांगितले शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना पायपीटीतुन मुक्ती भेटेल
राज्य सरकारने ई रिक्षासाठी अनुकूल असल्याचे पत्र हाय कोर्टाला दिले केंद्रीय पर्यावरण खात्याला देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले त्यांची देखील समंती असल्याने रिक्षा चालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. कोर्ट सुरू होताच पुढील आदेश लवकरच जारी होतील असे ललित मोहन यांनी सांगितले.
अशी माहिती शकील पटेल ( अध्यक्ष) प्रकाश सुतार (उपाध्यक्ष)
सुनिल शिंदे (सचिव) यांनी दिली.