पार्वती हॉस्पिटल - खोपोलीची प्रेरणादायी सेवा.
कोरोनाचा मुकाबला करणारे दोन महत्वाचे घटक ,म्हणजे वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा. या दोन्ही यंत्रणांचे समन्वय खोपोलीत दिसून आले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून योध्याचे काम करत आहे त्यामुळे त्यांच्या प्रकृती कडे साहजिकच दुर्लक्ष होत आहे ही बाब लक्षात घेऊन आपल्या अभियानाचे जेष्ठ सदस्य डॉ रणजित मोहिते आणि पार्वती हॉस्पिटल खोपोलीची टीम खोपोली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसांची आरोग्य तपासणी तर काहीना आवश्यकतेनुसार उपचारार्थ दाखल करत आहेत. ही सेवा संपूर्ण निशुल्क आहे अशी माहिती मिळाली आहे.
खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रणजित पाटील आणि खोपोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने दररोज टप्प्या टप्प्याने पोलीस कर्मचारी आपली आरोग्य तपासणी करून घेत आहेत.
कोव्हीड योध्यांच्या "एकमेका साहाय्य करू" या भूमिकेला सलाम. या अभियाना बद्दल डॉ मोहिते याना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल जास्त बोलण्यास नकार देत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य या हेतूने अशी सेवा करत राहू असे सांगितले.
आरोग्य आणि पोलीस यंत्रणेच्या या योद्धाना त्रिवार सलाम.
@गुरू साठेलकर
खोपोली