ऑफिस काम विसरून थोडीशी वेगळी पोस्ट... तुम्हा आम्हा सर्वांसाठी....!
टीम महाराष्ट्र मिरर
हे चित्र नीट बघा....
यात दगडाखाली अडकलेल्या माणसाला हे माहीत नसतं की, खाली फटीत साप आहे....वर येऊ पाहणाऱ्या त्या स्त्रिला माहीत नसतं की, तिला मदत करू पाहणारा माणूस भल्या मोठ्या दगडाखाली अडकून वेदनांनी विव्हळतोय....
स्त्री मनोमन विचार करते, मी दरीत पडणार आहे, फटीतल्या सापामुळे मला वर चढता येत नाही....अशा बिकट परिस्थितीत हा माणूस थोडा जोर लावून मला वर का काढू शकत नाही....
पुरुष मनोमन विचार करतो, पाठीवरच्या दगडामुळे मला असह्य वेदना होत असतानाही मी या स्त्रिला वर काढण्याचा प्रयत्न करतोय....तर ती वर येण्यासाठी स्वत:हून अजून थोडे प्रयत्न का करीत नाही....
या चित्रावरुन असा अर्थबाेध हाेताे की, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवरचा तणाव, त्याची परिस्थिती, हतबलता कधीच स्पष्ट दिसत नाही....त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीलाही पहिल्या व्यक्तीच्या वेदना, हतबलता लक्षात येत नाही.... प्रत्येक जण आपापल्या परीने परिस्थितीशी संघर्ष करीत असतो.... प्रत्येकाची काहीतरी मजबूरी, काहीतरी अडचण असते....काही मर्यादा असतात.
म्हणून जेव्हा जेव्हा परिस्थिती अशा प्रकारच्या कोड्यात टाकते तेव्हा एकमेकांना समजून घेणे गरजेचं असतं....समजून न घेता पूर्वग्रहातून एखाद्याविषयी करुन घेतलेले गैरसमज दोघांकरिताही हानीकारक असतात....म्हणून कुणाविषयीही गैरसमज करुन घेण्याअगोदर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा ...नातं टिकेल, पाॅझिटीव्हिटी वाढेल....जीवनात शांतता, आनंद आणि समाधानच मिळेल.
*Let's Try It...Let's Do It..!* 😊👍🏻