रायगड जिल्हयातील सर्व रूग्णालयात रेमडीसीवीर १०० एमजी (Remdesivir 100 mg injection) हे इंजेक्शन तातडीने जास्तीत जास्त उपलब्ध करावे!
वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांची मागणी
महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत
रायगड जिल्हात कोरोनाचे रूग्ण खुप मोठया संख्येने वाढत आहेत.अनेक रूग्ण दगावले सुद्धा आहेत.कर्जत मध्ये सुद्धा रूग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे इतर सुद्धा आजाराचे रूग्ण आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अत्यावस्थ रूग्णांना रेमडीसीवीर १०० एमजी इंजेक्शन *(Remdesivir 100 mg injection)* दिल्यास रूग्णांना श्वास घेण्यास होणारा ञास हा कमी होऊ शकतो आणि रूग्ण त्यातून बरा होऊ शकतो असे अनके डॉक्टरांचे मत आहे.सदर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रूग्णांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे.
आज दि.23/7/2020 रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका कर्जत यांचे वतीने वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत यांचे मार्फत जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग-रायगड यांना निवेदन दिले आहे की, रायगड जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व रूग्णालयात आणि खासकरून कर्जत सारख्या तालुक्यातील सर्व रूग्णालयात सदर औषधाची जास्तीत जास्त उपल्बधता तातडीने करावी अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, शहर पदाधिकारी लोकेश यादव उपस्थित होते.