103 वर्षाचा भाऊ आणि 101 वर्षाची बहीण,100 किमीहुन अधिक अंतर पार करून केलं रक्षाबंधन
कुलदीप मोहिते-कराड
कोरोना सारख्या सुद्धा महामारी मध्ये एक अनोखे रक्षाबंधन पहावयास मिळाले त्यातील एक पुरंदर तालुक्यातील सटलवाडी गाव आहे येथील 101 वर्षाची गजानन गणपत कदम त्यांची थोरली बहीण अनुसया ज्ञानोबा गायकवाड 103 राहणार दौंड आजही या दोघांनी इच्छाशक्तीच्या जोरावर राखी पौर्णिमेचे शतक साजरे केले दोघांनी वयाची शंभरी पार करूनही दोघांमधील प्रेम थोडे पण कमी झाले नाही असे भावा बहिणीचे नाते कमीच पाहायला मिळते कधीकधी भावाला वेळ नसतो तर कधीकधी बहिणीला वेळ नसतो कामानिमित्ताने सर्व लांब लांब असतात मात्र लॉकडाऊन काळात हे पुरंदर तालुक्यातील बहिण भाऊ एकच आकर्षण बनत आहेत समाजातील बहिण भावांना एक आदर्श घ्यायला हवा की कितीही वय झाले तरी आपला भाऊ आणि आपली बहीण हे आपलेच असतात रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटता येते व एक दुसऱ्यांना आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतात व हेच ह्या बहीण भावांनी करून दाखवले रक्षाबंधन सण हा म्हणजे बहीण भावा मधील अतूट नाते आणि ह्या ना त्या एवढी तोड कोणत्याच नात्याला नाही कारण आयुष्यामध्ये एक बहीण आपल्या भावाला समजून घेऊ शकते आणि भाऊ हा नेहमीच आयुष्यभर बहिणीला संकटातून तसेच वेगवेगळ्या कोणत्याही गोष्टीतून तिला मदत करत असतो फक्त एवढेच आहे की बहीण भावा मधील नाते खुप सुंदर आहे आणि ते असेच समाजामध्ये ह्या आजी-आजोबांचा सारखे टिकून राहावे