सोन्याचीवाडीला पुराच्या पाण्याने वेढलं,75 जण अडकले
माणगांव-रायगड
गोरेगाव, ता. माणगाव येथे गोरेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सोन्याची वाडी नावाचे एक गाव असून काळ नदीच्या पुराच्या पाण्यामुळे या गावाच्या चोहोबाजूंनी पुराचे पाणी आल्याने या गावांमध्ये 70 ते 75 लोक अडकले होते. रायगड पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभाग रायगड यांचे कडील बोटीने त्याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आत्ता पर्यंत 23 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
गोरेगाव येथील दत्त मंदिर याठिकाणी या लोकांना सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.