रायगड पोलीस दलातील एसडीपीओ अनिल घेरडीकर यांना उत्कृष्ट तपासकरिता पदक जाहीर..
आदित्य दळवी-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
रायगड जिल्ह्यातील कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर्षीच्या उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पदक जाहीर केले आहे.पोलीस दलात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एसडीपीओ अनिल घेरडीकर हे 2016 ते 2019 याकाळात परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना बोरी पोलीस स्टेशन हद्दीत एका नराधमांने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते.यासंबंधी बोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला होता .या घटनेने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट होती.या घटनेत कोणीही साक्षीदार नसताना एसडीपीओ घेरडीकर आणि तपासीक अंमलदार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक माहिती गोळा करून आरोपीचा मागोवा घेऊन त्यांना ताब्यात घेतले.गुन्ह्यातील सर्व पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध परभणी सत्र न्यायालयात खटला दाखल केला .खटल्याच्या सुनावणी अखेर आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याबाबींची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने एसडीपीओ घेरडीकर यांना पदक जाहीर केले आहे.