खालापूर नगरपंचायतीच्या वतीने आदिवासी सांस्कृतिक भवनाचे पूजन.
महाराष्ट्र मिरर टीम -खालापूर
खालापूर नगरपंचायतीच्या वतीने आदिवासी सांस्कृतिक भवनाचे पूजन..विशेष म्हणजे हे तालुका स्तरीय आदिवासी सांस्कृतिक भवन असणार आहे.,खालापूर तालुक्याचा विचार केल्यास बहुतांश विखुरलेल्या स्वरुपात आदिम कातकरी जमातीच वास्तव्य आहे..खालापूर नगर परिषद हद्दीत 45% कातकरी बहुल आदिवासी असल्याकारणाने,आमच्या हद्दीत या प्रकारचे सांस्कृतिक भवन असणे गरजेचे होते,या साठी नगर पंच्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्यामुळे,नागरी सेवा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाल्यामुळे हे भवन सत्यात साकारता येणार आहे,ज्याची पायाभरणी आज या जागतिक मूलनिवासी दिनी करताना,अम्ह्या सर्वांना विशेष समाधान आणि आनंद आहे..जेणे करून या मार्फत तालुक्यातील आदिवासी बांधवांना विविध कार्यक्रमांसाठी एक हक्काचे व्यासपीठ भेटेल..त्याद्वारे त्यांच्या सांस्कृतिक, शेक्षणिक,आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न होतील यात काही शंका नाही..
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मान्यवरांनी आदिवासी बांधवाना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार उपस्थित होते तसेच खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे प्रभारी अध्यक्षा शिवानी जंगम माजी नगराध्यक्षा गुलाब पवार, दीपक नाईक नगरसेवक संतोष जंगम उपस्थित होते तसेच आदिवासी समाजाचे मारुती पवार,दिलीप डाके, अंकुश वाघ, संतोष मेंगाल, गणेश केवारी, यांचे सह समाज बांधव उपस्थित होते
सुरेखा भणगे
मुख्याधिकारी खालापूर नगरपंचायत..