साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट उंब्रज तालुका कराड यांच्यातर्फे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,मा.श्री. अजय गोरड साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार
कुलदीप मोहिते-कराड
साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट उंब्रज तालुका कराड यांच्यातर्फे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,मा.श्री. अजय गोरड साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना सारख्या महामारी मध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्ट चे संस्थापक- अध्यक्ष,मा.श्री. शैलेशदादा मोहिते यांनी मा.श्री. अजय गोरड साहेब यांचा सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी कोरोना सारख्या महामारी प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल मार्गदर्शन केले.सौ सुरेखा भोसले यांनी मनोगत मांडून आभार व्यक्त केले. यावेळी सौ अश्लेषा मोहिते,श्री सचिन डुबल,श्री सुनिल पवार, चि.वेदांत मोहिते,चि.आदित्य कदम , श्री. अशोक भोसले तसेच उंब्रज पोलीस स्टेशनचे श्री लवटे दादा व इतर कर्मचारी उपस्थित होते.