कृषी विभागामार्फत नियमित पिकावरील किड-रोग सर्वेक्षण .
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही खरीप हंगाम सण 2020 मध्ये कृषी विभागा मार्फत पिकावरिल किड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ( क्रॉपसॅप ) अंतर्गत सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे .तालुक्यातील विविध गावात मका ,ज्वारी ,ऊस ,सोयाबीन क्षेत्रावरील ३१ कृषी सहाय्यक प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण १९० फिक्स प्लॉटचे तसेच ६ कृषीपर्यवेक्षक एकूण 36 फिक्स प्लॉटचे साप्ताहिक नियमीत सर्वेक्षण करत आहेत . तर कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे रँण्डम पध्दतीने प्लॉटचे सर्वेक्षण करत आहेत . राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांनी विकसित केलेल्या मोबाईल ॲपच्या माहितीने खरिप हंगामामध्ये भात , सोयाबीन ,कापूस ,तूर ,मका,ज्वारी ऊस या पिकांचे तर रब्बी हंगामामध्ये हरभरा ,मका ,ज्वारी या मुख्य पिकांचे किड-रोग सर्वेक्षण व नियंत्रण करावयाचे आहे .आणि आपत्कालीन परिस्थिती मध्ये किड-रोगांचे व्यवस्थापन करावयाचे आहे . सदर मोहीमे अंतर्गत साप्ताहिक सर्वेमध्ये पिकामध्ये फोरम सापळे लावून पिकांचे आर्थिक नुकसानीची पातळी ठरवली जाते .व औषध फवारणी संदर्भात प्राप्त संदेशाचे प्रचार प्रसिद्धी करून वेळीच उपाययोजना सुचवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळले जाते .