माणकिवली गावातील ओम बजरंग तरुण मंडळाच्या युवकांचा आगळावेगळा उपक्रम, हनुमान मंदीराची व परिसराची केली स्वच्छता
सोहेल शेख-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
सामाजिक कार्यकर्ते मधुकरभाऊ गंगावणे ह्यांच्या पुढाकाराने माणकिवली गावातील ओम बजरंग तरुण मंडळातील युवकांनी गावातील पुरातन हनुमान मंदीराची व आसपासच्या परिसराची स्वच्छता केली. त्याचबरोबर मंदिरातील फरशांमध्ये पडलेल्या मोठमोठ्या भेगांमध्ये हाताने सिमेंट भरून भेगा भरुन घेतल्या, फरशांमध्ये भेगा पडल्यामुळे मंदिरात किड्या मुंग्याचे वारुळ तयार होत होते. मंदिर व मंदिराच्या आजुबाजूच्या परिसरातील स्वच्छता केल्याने हनुमान मंदिर व परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी मनोमन समाधान व्यक्त केले. तसेच मंदिर उभारण्यावेळी बांधलेल्या एका खिडकीला वारुळ लागुन ती खिडकी पुर्णतः खराब व धोकादायक झाली होती. मंदिरातील खराब झालेली खिडकी पाहुन मंडळाचे सदस्य ओमकार पवार यांनी खिडकी दुरुस्त करण्यासाठी सिमेंट, कडप्पा व स्टाईल लादी उपलब्ध करून दिली.
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे ह्या मुलमंत्राने प्रेरीत होऊन ओम बजरंग तरुण मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक कार्यकर्ते मधुकरभाऊ गंगावणे ह्यांच्या हाकेला साद देऊन मंदिर व परिसराच्या स्वछता मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच कडाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष मुकणे व त्यांचे दोन चिरंजिव विजय मुकणे व रोहित मुकणे ह्यांनीही मंदिरातील स्वच्छता कार्यास व मंदिरातील खिडकी दुरुस्तीच्या कामात मिस्त्री असलेल्या आपल्या वडिलांसोबत विशेष असे कौतुकास्पद काम करून जणु सेवा परमो धर्म: ह्या अभंगवाणीची प्रचिती दाखवुन दिली. गावातील हनुमान मंदीराच्या स्वच्छता व दुरुस्ती प्रसंगी मंडळाच्या युवकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन काम केले. सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते मधुकर गंगावणे, माजी सरपंच संतोष मुकणे, अंकुश गंगावणे, प्रफुल गंगावणे, ओमकार पवार, आकाश गंगावणे, प्रशांत पवार, सुमित पवार, विजय मुकणे, रोहित मुकणे, गणेश पवार, एकाच नावाचे दोन बालसदस्य समर्थ गंगावणे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.