सिव्हिल सर्जन च्या कारभाराविरोधात रिपाई आक्रमक
सिव्हिल सर्जनच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरणार -अशोक गायकवाड
मिलिंद लोहार -सातारा
सिव्हिल मध्ये स्वच्छतागृहाच्या ड्रेनेजमध्ये मृत मानवी अर्भक सापडले हे आरोग्य यंत्रणेला काळीमा फासणारी बाब आहे आरोग्य विभागाचे प्रमुख असणारे डॉक्टर अमोल गडीकर हे आपली जबाबदारी झटकत आहेत ते सरळ-सरळ खोटे बोलत असून त्यांना त्यांची जबाबदारी समजत नसेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया रस्त्यावर उतरून त्यांना जबाबदारीची आठवण करून देईल असा इशारा देत रिपाई तर्फे त्यांना घेराव घालण्यात आला. पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल ला भेट दिली डॉक्टर गडीकर यांना घेराव घालत त्यावेळी चौकशी समितीचे सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठवले हेही उपस्थित होते अशोक गायकवाड म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्री जातीचे मृत भ्रूण टॉयलेट मधून बाहेर काढले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे समाजमनात संतापाची लाट तयार झाली असून फॅमिली मध्ये झालेल्या गर्भपाता संबंधी रान उठले आहे व्हिडिओमध्ये जो गर्भ पूर्णपणे वाढल्याचे दिसत आहे असे असताना त्याचा गर्भपात कसा झाला यामध्ये कोणते रॅकेट आहे का असे अनेक सवाल उपस्थित होत आहे मात्र सिव्हिल मधील अशा या कारभाराला जबाबदार कोण मात्र सिव्हिल चे सर्व अधिकारी हात झटकायला लागले तर यामागे नक्की लपलय काय आत मध्ये चालले तरी काय नक्की हे समाजासमोर येणे गरजेचे आहे व अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची भडिमार करून सिव्हिल सर्जन डॉक्टर गडकर यांना घेराव घातला मात्र सिव्हिल सर्जन डॉक्टर गडी कर यांनी सारवासारव करत सांगितले की आम्ही सर्व माहिती संबंधितांना दिली आहे मी किंवा ठेकेदारांनी संबंधित सफाई कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही असे बोलून गडी करांनी आपली जबाबदारी झटकली तर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गायकवाड यांनी यावेळी केला मात्र सातारा सिव्हिल मधील भोंगळ कारभार लवकरात लवकर थांबला पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला
दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सातारा दौऱ्यावर असून त्यांच्या कानावर हा विषय टाकण्यात येणार ते काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे