नगराध्यक्षा रोहिणी शिंदे झाल्या कोरोना मुक्त
कुलदीप मोहिते -कराड
कराड येथील नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता गेल्या दहा दिवसांच्या उपचारानंतर सौ शिंदे कोरोना मुक्त झाल्या . त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे काेराेणाची लढाई जिंकलेल्या रुग्णाचा सत्कार कृष्णा हॉस्पिटल चे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला कोराेना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सौ शिंदे सातत्याने शहरातील नागरिकांना सतर्क करत होत्या शहरात सर्वत्र फिरून नागरिकांना आवाहन करत होत्या त्यातच त्यांना एखाद्या कराेना बाधितांकडून लागण झाली असल्याची शक्यता होती सौ शिंदे त्यांना घरातच विलगीकरण करण्यात आले होते व त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला असता त्यांचा अहवाल पॉझिटिव आला होता त्यानंतर त्या कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेत होत्या.
कराड शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत असताना जनतेच्या सेवेत सतत कार्यरत असणाऱ्या कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी कोराेनावर मात करून दाखवून दिले की समाजातील लोकांनी घाबरू नये कोराेनावर मात करता येते .कराडमधील जनतेने घाबरून जाऊ नये एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव आला तर त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही कोराेनावर मात करता येते हे यातून सिद्ध होते
तसेच नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी डॉक्टर सुरेश भोसले कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांचे आभार मानले.पीपीई किटमध्ये जणूकाही भगवंताचे दर्शन झाले येथे येणारे सर्व रुग्ण बरे होत आहेत पुन्हा कराडवासियाच्या सेवेसाठी हजर राहणार आहे असे सांगितले .