काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश (भैय्या )कदम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
उमेश पाटील
महाराष्ट्र मिरर टीम सांगली
काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश कदम (भैय्या ) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना भारती हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे .
त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते लवकरच कोरोनावर मात करून
घरी परत येतील .दरम्यान डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून स्वतः ही माहीती दिली आहे.
व निकटच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वतः विलगिकरण करून घ्यावे तसेच लक्षणे दिसत असतील तर कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी केले आहे.