Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा




महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा


नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

अमृता कदम-अलिबाग

सावित्री नदीने धाेक्याची पाणी पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला असून नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
        सर्वसाधारणपणे सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी 6.50 मीटर असून सद्य:स्थितीत ही धोका पातळी सावित्री नदीने ओलांडली असून सकाळी नऊ नऊच्या सुमारास ही पातळी  7.30 मीटर इतकी झाली असल्याची माहिती प्रशासनाने  दिली आहे.
         सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पाेल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे.स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,  अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 115 मि.मी.पावसाची नोंद

  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 115.71 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण  सरासरी 1 हजार 670.06 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.     
        आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
अलिबाग 79.00 मि.मी., पेण-60.00 मि.मी., मुरुड-92.00 मि.मी., पनवेल-72.80 मि.मी., उरण-134.00 मि.मी., कर्जत-60.60 मि.मी., खालापूर-65.00 मि.मी., माणगांव-160.00 मि.मी., रोहा-198.00 मि.मी., सुधागड-160.00 मि.मी., तळा-126.00 मि.मी., महाड-97.00 मि.मी., पोलादपूर-197.00 मि.मी., म्हसळा-165.00मि.मी., श्रीवर्धन-98.00 मि.मी., माथेरान-87.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 851.40 मि.मी.इतके असून सरासरी 115.71 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 51.92 मि.मी.इतकी टक्के आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies