प्रांत अधिकारी यांनी घेतला नगर परिषद पूर नियंत्रण कक्षाचा आढावा
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूणचे प्रांताधिकारी श्री.प्रविण पवार यांनी चिपळूण नगर परिषद येथे प्रत्यक्ष भेट देऊन पूर नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला. यावेळेस मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी नगर परिषदेने केलेली तयारी बाबत माहिती दिली. गेल्या वर्षी भरलेल्या पाण्याचा अनुभव लक्षात घेउन नगर परिषदेने अधिकची तयारी केली आहे. शहरातील पाणी भरणारी ठिकाणे निश्चीत केली असुन सात स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामधे विभाग प्रमुखांसोबत सात कर्मचारी आणि दहा सफाई कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. नगर परिषदेचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असुन अधिकचे कर्मचारी नियुक्त केले आहेत.नगर परिषदेने यंदा नवीन साहित्य खरेदी केले असुन तीन बोटी भाडेतत्वावर घेतल्याचे संगितले. या बैठकीला उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधिक्षक अनंत मोरे, राजेंद्र जाधव, संतोष शिंदे, वैभव निवाते, विनय भोळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सतत पडणारा पावसाचा विचार करुन नगर परिषद, नागरिक व व्यापारी यांनी सतर्क रहाण्याच्या सुचना प्रांत अधिकारी यांनी केली.