पोलीस मित्र संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी उत्तम बाळू ठोंबरे यांची नियुक्ती
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
पोलीस मित्र संघटना रायगड यांच्या वतीने.आज ... पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत... महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत रायगड जिल्हा.....कर्जत तालुक्यातील महत्वाच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी. यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून उत्तम बाळू ठोंबरे,यांची नियुक्ती करण्यात आली,कर्जत तालुका युवा अध्यक्ष मिलिंद डुकरे, तर तालुका कायदेशीर सल्लागार उत्तम गायकवाड,तसेच खालापूर तालुक्याच्या पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा सहसचिव दत्ता शिंदे,प्रथम जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित जिल्हा पदाधिकारी... रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने,जिल्हा महासचिव रमेश कदम, जिल्हा सचिव सुप्रेश साळोखे, जिल्हा संघटक किशोर गायकवाड, जिल्हा सल्लागार दीपक बोटूनगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.