Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अयोध्येत भगवान श्रीराम यांची २१५ फूट उंच मूर्ती साकारणार शिल्पकार राम सुतार

अयोध्येत भगवान श्रीराम यांची २१५ फूट उंच मूर्ती साकारणार शिल्पकार राम सुतार  

विजय चौधरी, खुलताबाद 
अयोध्येत भगवान श्री रामांचा २१५ फूट उंच पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे साकारणार आहेत.

राम सुतार! , नाम ही काफी है!' देश परदेशात सहजतेनं शिल्प साकारत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटणारे आणि प्रत्येकच प्रकल्पातून सतत नाविन्याचा शोध घेणारे शिल्पकार! राम सुतार हे नाव आता फक्त महाराष्ट्र राज्य, भारत देशापुरतेच मर्यादीत राहिलेले नाही. ते देश, परदेशात पोहोचले आहे. 
वास्तविक आपला ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराची ओळख  वेरूळ, खुलताबादशी निगडित आहे,ते वेस्टर्न सर्कल येथील भारतीय पुरातत्त्व विभागात औरंगाबाद येथे सन १९५४-५८  दरम्यान नोकरी करीत असताना त्यांनी अजिंठा व वेरुळ येथील अनेक शिल्पांच्या जीर्णोद्घाराचे काम पाहिले.खुलताबाद येथील जुना बाजार गंज येथे ते राहत होते.
नंतर ते नवी दिल्लीत माहिती व प्रसारण मंत्रालयातील दृक्‌श्राव्य प्रसिद्घी विभागात तांत्रिक साहाय्यक या पदावर कार्यरत होते. १९५८-५९ मध्ये तिथून राजीनामा देऊन त्यांनी पूर्ण वेळ शिल्पकार होण्याचे ठरविले. त्यांनी वैविध्यपूर्ण शिल्पकलेचा वारसा जपला आहे. जीव ओतून शिल्पकला  करणारा कलावंत ही सुद्धा त्यांची एक ओळख आहे.
राम सुतार यांनी अलिकडेच गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला होता. 

भगवान श्री राम यांच्या या पुतळ्याच्या निर्मितीसाठी ४४७ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागणार आहे, यासाठी सरकारने ४४७ कोटींचे वाटप केले आहे. सरयू नदीच्या काठी मीरपूर गावात हा पुतळा बसविला जाईल.
अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा ९५ वर्षीय अवलिया. अयोध्येतील भगवान श्री राम मंदिरात बसविण्यात येणारी श्रीरामाची जगातील सर्वात उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत १५०० पुतळे साकारणारे एक 'राम'च करणार आहेत. 

९५ वर्षीय राम वंजी सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे  झाला आहे. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर ६३ येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (२०८ मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. २० मीटर उंचीचे चक्र ५० मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.
राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२  मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२  मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील १६ पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे ५० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला १६ फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies