सिव्हिल मधील भ्रूण मृत्यूला गंभीर वळण सिव्हिल कर्मचार्याचा आत्महत्येचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश
मिलिंद लोहार-सातारा
जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिविल मृत अर्भक प्रकरणात जा सफाई कर्मचाऱ्याने टॉयलेट मधून मृत अर्भक बाहेर काढले त्याला जिल्हा शल्यचिकित्सकांनी कामावरून काढल्याचा प्रकार घडला आहे या प्रकारामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत संबंधित सफाई कर्मचारी विनोद मकवाना याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल गडीकर यांनी भीती पोटी आपल्यावर कारवाई केल्याचा आरोप करत त्याच्या वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सफाई कर्मचारी विनोद मकवाना यांनी केले आहे दरम्यान सिव्हिलच्या सर्व भानगडी प्रकरणी तत्काळ सखोल चौकशी करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत सिविल हॉस्पिटल मधील स्त्री जातीचे मृत भ्रूण टॉयलेट मधून बाहेर काढले जात असल्याचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून सिविल मध्ये झालेल्या गर्भपाता संबंधी संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे येथे दोन दिवस सिविल मधील या असंवेदनशील घटनेचा निषेध होत असताना गुरुवारी रात्री या घटनेला आणखी गंभीर वळण लागले आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सिव्हिल मधील सफाई कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याचे सांगण्यात आले या घटनेने कर्मचाऱ्याने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामुळे घटनेत आणखी ट्विस्ट निर्माण झाला त्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता त्याचे नाव विनोद मकवाना असल्याचे समोर आले त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व आपली कैफियत मांडली विनोद मकवाना हा मूळचा गुजरात राज्यातील असून तो पत्नीसोबत साताऱ्यात वास्तव्य करत आहे त्याची पत्नी सिविल मध्ये कायमस्वरूपी चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे तर तो स्वतः तात्पुरत्या पदावर सिविल मध्ये स्वच्छता कामगार म्हणून आहे सिव्हिल मधील मृत अर्भकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मकवाना याला सिविल मध्ये दोन दिवस चुकीची व वाईट वागणूक मिळाली गुरुवारी त्याला कामावरून काढण्यात आले असे सांगण्यात आले व मानसिक त्रासामुळे मकवाना यांनी गुरूवारी रात्री फिनेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विनोद मकवाना हा हिंदी भाषीक आहे त्याने पत्रकारांशी बोलताना असे म्हटले आहे की मी गेल्या काही दिवसांपासून कोविड विभागात ड्युटी करत आहे दहा दिवसांपूर्वी मला एका टॉयलेटमध्ये स्वच्छता करायची असल्याचे सांगितले मी तिथे गेल्यानंतर तेथे रक्त पडलेले दिसले ते भांडे चोकप झाले होते त्यातून मृत लहान बाळ निघाले या घटनेनंतर अचानक दोन दिवसानंतर ऑफिसमधून तुमच्यावर कारवाई करतो असे म्हणत प्रेशर देऊ लागले माझ्यावर वेगवेगळे जबाब लिहून घेतले आहेत मृत अर्भक प्रकरणात कोणताही दबाव न केल्याचा जबाब दोन दिवसापूर्वी दिल्यानंतरही मला वाळीत टाकल्यासारखे वागणूक मिळु लागली आहे या घटनेमुळे माझे कुटुंबीय घाबरले दोन दिवसापासून सिविल मधील कर्मचारी अधिकारी कोणीही नीट बोलले नाहीत भेदभावाची वागणूक मिळू लागली त्यामुळे मी असा कोणता गुन्हा केला आहे याचा मला प्रश्न पडला तरी आल्यानंतर पत्नीनेही सिविल मधून दबाव येत असल्याचे सांगितले पत्नीनेही मी परमनंट असून कामावरून काढले तर आपण कसे जगू अशी भीती व्यक्त केली गेल्या दोन दिवसांपासून सिव्हिल मधील चुकीची वागणूक मिळाल्याने अन्न गेले नाही व सतत टेन्शन वाढत गेले सिविल प्रशासन आमच्यासोबत चुकीचे वागत आहेत मला व माझ्या पत्नीला जीवाची भीती वाटत आहे आमच्यावर हल्ला होण्याची भीती वाटत आहे मला फोन येत आहेत माझ्या पत्नीला फोन येत आहेत व धमकावले जात आहे की त्याला कुठे पाठवू नका ड्युटीला ही त्यांनी जायचे नाही सिव्हिल सर्जन यांनीही माझ्या पत्नीला भीती दाखवली आहे दोन दिवसापूर्वी ऑफिसमध्ये यावरून मजबूत बाचाबाची झाल्याने सिव्हिल मधील माझे सहकारी माझ्यापासून लांब राहू लागले माझ्यावर अन्याय होऊ नये त्यासाठी मी इथून निघून जाण्यास तयार आहे फक्त हे लोक डाऊन उठू द्या आम्ही साधी माणसे आहोत परंतु तोपर्यंत पोलिसांनी माझी तक्रार द्यावी व सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी रिक्वेस्ट कर्मचाऱ्यांनी केली आहे विनोद मकवाना यांच्या या विधानामुळे खळबळ माजली असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल गडिकर हे धमकी देत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर येत आहेत तसेच असेल तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे सिव्हिल मधील घडलेल्या प्रकरण जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी गंभीर दखल घेतली सिव्हिल मधून एकामागोमाग एक गंभीर घटना समोर येऊ लागल्याने कारभार सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने त्यातील संवेदना तीव्र आहे यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत
(( यातून वेगवेगळ्या प्रश्न निर्माण होत आहेत सफाई कर्मचारी मग कोणाला कोणी कोणी फोन केले आहेत सिव्हिल सर्जन च्या केबिन मध्ये कोणत्या चार जण त्याला घेरले होते त्याच्या पत्नीला कोणी दम दिला मग कोणाला खोटे जबाब कुणीकुणी लिहून घेतले त्या सर्वांची जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीने चौकशी करायला हवी असेल तर सफाई कर्मचारी काढून टाकण्याचे कारण काय तुम्ही एका गरीब कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उठण्याचे कारण काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले असून सिविल सर्जन यांनी सिविल मध्ये कोणत्या चौघांची टोळी पाळली आहे त्यामुळे चौकशी समितीने पारदर्शकपणे तपास करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे
माझ्या पत्नीवर प्रेशर प्रॅक्टिस केली जात आहे गुरुवारी सीएम डॉक्टर अमोल गडीकर यांनी सांगितल्यामुळे मला ड्युटी वरून काढून टाकले आहे माझी अवस्था ना घरका ना घाट का झाल्याने माझ्या मनात आत्महत्येचे विचार आला माझ्या पत्नीला मानसिक त्रास दिला असल्याने मला मारण्याच्या पर्याय राहिला नाही -विनोद मकवाना सफाई कर्मचारी