युनियन बँकेमुळे माथेरानकर त्रस्त
बँकेचे सर्व अपडेट व्यवहारची जबाबदारी कोण घेणार,?
मनसे माथेरान शाखे तर्फे निवेदन
चंद्रकांत सुतार-माथेरान
पावसाळा ह्या वर्षी वेळेत सुरू झालाय ,परंतु सुरवातीलच पाऊससोबत चक्रीवादळ ला घेऊन आला नी सर्वांचीच दाणादाण उडवली आहे, मागील 5 महिन्यापासून कोरोना मुळे सर्व जनजीवन व्यवहार ठप्प झाल्याने सर्व नागरिक हतबल झाले आहे.माथेरान मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया ही एकमेव बँक आहे, ह्या बँकेचा जो व्यवहार, ग्राहक सुविधा चालू आहे,त्या मुळे गेली अनेक दिवस ग्राहक अक्षरशा कंटाळलेला आहे, मागील वर्षभरापूर्वी बँकेच्या रेनिवेशनमुळे बँकेचे व्यवहार हे तात्पुरता शेजारील रूम मध्ये चालू केले आहेत, त्यामुळे येथे गेल्या वर्षी पासून प्रॉपर ज्या मशीन पाहिजे त्या आणल्या गेल्या नाही आजही चार पैकी 2 pc चालू आहेत, बँकेचे पूर्ण आपडेड नाही, अनेक वेळा ATM बंद पडत आहे, सर्व शासकीय कर्मचारी वर्गाचे पगार, पेंशन ह्याच बँकेतून दिले जाते, अनेक ग्राहकाचे खाते
येथे असल्याने त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही, वयोवृद्ध, पेन्शन धारक , असो अथवा पैशाचीअत्यंत गरज असताना सुद्धा ग्राहकांना सतत सतत बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहे, त्या मुळे अनेक वेळा येऊनही बँकेत काम झाले नाही तर ग्राहक व बँकेतील कर्मचार्याची वाद होताना दिसत आहे, सतत चेक चे अपडेड उशिरा होत असल्याने ग्राहकाना सकाळी 10 ते दुपारी 12 असे 2 तास बसून ठेवले जाते, स्वतचाच पैसा काढताना ही ग्राहकांना 2 तास बसण्याची शिक्षा म्हणजे बँक अधिकारी ,व रिजनल ऑफिस ठाणे यांचा हलगर्जीपणाच दिसून येत आहे, अनेक वेळा बँक मित्र म्हणून सुरू असलेले नताशा मोरे यांच्याकडे atm द्वारे पैसे मिळतात पण युनियन बँकेत नेट प्रॉब्लेम चे कारण पुढे केले जाते, बँकेचे सर्व व्यवहार मराठीतून व्हावे अशा अनेक तक्रारी वजा इशारा चे निवेदन आज म न सेचे शहर अध्यक्ष संतोष कदम, यांनी माथेरान युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक बनसोडे साहेब यांना देण्यात आले, याबाबत पूर्वी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, अनेक तक्रारी ठाणे ब्रँचला जाऊनही येथील परिस्थिती सुधारत नाही त्यामुळे बँकेच्या कर्मचारी वर्गाला ही ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे,,त्यामुळे नक्की तक्रार कुठे करायची हा मोठा प्रश्नच आहे, आजच्या निवेदन देताना तालुका संपर्क प्रमुख, मानव कदम, असिफ खान, संतोष केळगने, , ओमकार आखाडे, विशाल रांजाणे, संदीप कोळी, आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.
यापूर्वी आम्ही बँकेच्या व्यवहाराबाबत लेखी तक्रार केल्या होत्या, परंतु तेवढ्यापुरता सुरळीतपणा दाखवून नंतर पुन्हा परिस्थितीत जैसे थे त्यामुळे माथेरांनकर, पर्यटक हैराण झाले आहेत गणपती पर्यंत जर सर्व परिस्थिती सुधारली नाही तर म न से स्टाईल ने उत्तर दिले जाईलसंतोष कदम- म न से, माथेरान शहर अध्यक्ष
धन्यवाद साहेब
ReplyDelete