बहाद्दूरशेख पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा घाट : शौकत मुकादम
या आधीही तीनवेळा झाले होते ऑडिट
ओंकार रेळेकर-चिपळूण
बहाद्दूर शेख नाका येथील सुरू असलेल्या पुलाच्या कामाचे पुन्हा पुन्हा स्ट्रचर ऑडिट कशाला असा सवाल करून या मागे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे नेमके काय उद्धिष्ट आहे हे जनतेला कळले पाहिजे अशी मागणी चिपळूण चे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केले आहे,
ते पुढे म्हणाले,त्यापेक्षा अर्धवट का मे पूर्ण करा इंग्रज सरकारने याआधीच या फुलाची कालमर्यादा संपल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळवलेले आहे . त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटचा नव्याने कशासाठी चौपदरीकरण अंतर्गत बांधण्यात येणारा नवा पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करू असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सातत्याने सांगण्यात येत होते . या शिवाय तत्कालीन सार्व . बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबर २०२० पूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण होईल , अशी घोषणा केली होती . मात्र , या घोषणा आता हवेत विरल्या आहेत . सावित्री नदीवरील पूल सहा महिन्यात पूर्ण होऊशकतो . मात्र , वाशिष्ठी शास्त्री पुलाला वर्ष होत आली तरी हे पूल अर्धवट स्थितीत पडले आहेत . जुन्या पुलांच्या ऑडिटच्या खटाटोपापेक्षा अर्धवट स्थितीतील पुलाचे काम पूर्ण करण्यास पावले उचलावीत , अशी मागणी मुकादम यांनी केली आहे