पोलीस कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू
सुधीर पाटील -सांगली
कुपवाड येथील औद्योगिक पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे 34 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . पोलीस दलाचा पहिला बळी गेलेला आहे . मिरज पोलीस ठाण्यातील एक महिला अधिकाऱ्यास कोरोना ची लागण झाल्याने पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी तातडीने प्रत्येक पोलिस ठाण्यात रॅपिड एंन्टीजन टेस्ट करण्याचा सूचना दिल्या .या तपासण्यांमध्ये वीस हूनअधिक पोलीस कर्मचाऱ्यांना लागण झाली असल्याने त्यानंतर तब्बल 48 तासांनी पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती . कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात रॅपिड चाचणीत एकाला लागन झाली नव्हती . मृत पोलिस कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांचे स्व्याब चे नमुने तपासणी साठी पाठल्यानंतर त्यांचे अहवाल आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले उपचारानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली रात्रीपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आज सकाळी उपचार सुरू असताना हा दुर्दैवी मृत्यू आला आहे ते 2017 मध्ये कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात शिपाई या पदावर कार्यरत होते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत पोलीस दलातील पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे .