राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी योगेश शिर्के यांची निवड.
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण तालुक्यातील चिवेली गावचे सुपुत्र योगेश शिर्के यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने चिपळूण तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थानिक पदाधिकाऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ पातळीवरून योगेश शिर्के यांना ही संधी देण्यात आली आहे. योगेश शिर्के युवा मंच यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर,क्रिकेट स्पर्धा,मुलांचे सत्कार,कोरोनामध्ये युवकांना घेऊन गावातील लोकांची व्यवस्था करणे यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवुन तरुणांची फळी निर्माण केली.यांची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली.कोणतेही काम अतिशय प्रामाणिकपणे करणे ,अडीअडचणिमध्ये मदत करणे यामुळे ते तरुणामधल आवडते व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.