अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने घेतली शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट
कुलदीप मोहिते -कराड
सातारा जिल्ह्यातील अभिनेत्री अश्विनी महांगडे झी मराठी वाहिनीवरील सिरीयल छत्रपती संभाजी राजे मधील राणू अक्का यांची भूमिका साकारणारी अश्विनी महांगडे आणि तिच्या वडिलांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते पसरणी या वाईजवळच्या गावात होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनेत्री म्हणून तिची जडणघडण झाली. स्वराज्य रक्षक संभाजी या झी मराठी वरील मालिकेतल्या राणू अक्का या भूमिकेमुळे तिला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.