जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन
अमृता कदम-
महाराष्ट्र मिरर टीम
कृषी विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आज अलिबाग एस. टी. स्टँड येथे आयोजन करण्यात आले हाेते.
या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी विभागाच्या आत्मा कार्यालयाचे उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाला तालुका कृषी अधिकारी श्री.बैनाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पेश पाटील व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
तसेच आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार महेंद्र दळवी तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
तालुका कृषी कार्यालय, उरण यांच्यातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी "रानभाज्यांची ओळख" हा उपक्रमही राबविण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, मंडळ कृषी अधिकारी एन.वाय घरत, कृषी सहाय्यक शितल ढाकणे, श्री.गाताडी, कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच सरपंच श्रीमती भगत यांची उपस्थिती होती.