माथेरान कर्जत मिनी बस सुरू करा
म.न.से.ची मागणी
चंद्रकांत सुतार-माथेरान
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखा माथेरानच्या वतीने आज दिनांक 7/08/2020 रोजी माथेरान नेरळ ते कर्जत या दरम्यान लॉक डाऊन काळात बंद असलेली **मिनी बस**किमान गणपती आगमनाच्या अगोदर 8 ते 10 दिवस चालू करावी, ह्या साठी माथेरान मनसे च्या वतीने कर्जत बसडेपो प्रबंधक यादव साहेबांकडे लेखी निवेदन देण्यात आले, कोरोना लॉकडाऊन असल्याने मार्च महिन्यापासून कर्जत, माथेरान मिनी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे, सद्या पुढील गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे,किमान या काळात तरी फक्त माथेरानकारणांसाठी मिनी बस सेवा सुरू करावी, कारण सद्या नेरळ माथेरान टेक्सि सेवा बंद आहे , लोकल ट्रेन ही बंद असल्याने , कर्जत येथून ज्याचे दरवषी गणपतीमूर्ती ऑर्डर असतात तेथून गणपती मूर्ती किंवा गणेशोस्तव साहित्य इतर गोष्टी आणण्यास मदत होईल, सद्या ह्या साठी किमान प्रायव्हेट गाडीला 1000/1200 ₹ मोजावे लागत आहे, ह्या सर्व गोष्टींची जाणीव लक्षात घेऊन महाराष्ट्र नव निर्माण सेना माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम यांनी आज कर्जत येथे जाऊन कर्जत बसडेपो प्रबंधक यादव साहेबांना माथेरान मिनी बस सुरू करावी असे लेखी निवेदन दिले या वेळी उपाध्यक्ष आसिफ खान त्याचे सहकारी पवन कोतवाल, कल्पेश कदम उपस्थित होते.