भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे कर्जत बँकांसमोर पीक कर्जासाठी ठिय्या आंदोलन.
नरेश कोळंबे-कर्जत
भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा च्या वतीने आज कर्जत मधील बँकांसमोर पीक कर्ज तसेच किसान क्रेडिट कार्ड साठी ठिय्या आंदोलन करण्यात आहे.
भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी शेतकरी सभा झाली होती व आज त्यांनी विविध मागण्यासाठी बँक ऑफ इंडिया च्या कर्जत शाखेसमोर ठिय्या आंदोलन केले. कोरोणा च्या या संकटात शेतकरी मालाला भाव नाही , दुधाला योग्य दर नाही तसेच घरांची पडझड यामुळे शेतकरी त्रासलेले आहेत. असं असताना या बँकेच्या शाखा शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत व कर्ज मंजूर करत नसल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी पुढाकार घेत ठिय्या आंदोलन केले.
भाजप किसान मोर्चाकडून सर्व देशभरात आंदोलने होत असून , पीक कर्ज, दुध - मालाला भाव, किसान क्रेडिट कार्ड, त्यांना 7/12 व 8 अ अशी शेतीविषयक सर्व कागदपत्रे घेऊन त्यांना कर्ज द्यावे.अशा मागण्या बँक प्रशासनाकडे निवेदन देऊन करण्यात आल्या.
या मोर्चासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, सरचिटणीस दीपक बेहेरे, पुंडलिक पाटील, कर्जत उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जत नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विनायक पवार, तसेच भाजपमधील गायत्री परांजपे, धनंजय थोरवे, मंदार मेहेंदळे, रमाकांत जाधव , मिलिंद खंडागळे,संजू ठाणगे आदी कार्यकर्ते सहभागी होते.