महाराष्ट्र मिररचा दणका; वाकडी ग्रामपंचायतच्या तणनाशक फवारणीला सुरुवात तर जनजागृती करतायेत आरोग्य कर्मचारी...
ज्ञानेश्वर काकडे-भोकरदन
"आरोग्य कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार?ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.." या मथळ्याखाली कालच हे वृत्त महाराष्ट्र मिररने प्रकाशित केलं होतं.याचा इम्पॅक्ट होऊन ग्रामपंचायतने तणनाशक फवारणीला सुरुवात केली असून गावात एक डेंगू रुग्ण आढळून आल्याने गावात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन याबाबत जनजागृती करत आहेत .