तिवरे गावठाण नळपाणी योजनेचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
ओंकार रेळेकर-चिपळूण
तिवरे धरण दुर्घटनेमध्ये पाण्याच्या प्रवाहाने उद्ध्वस्त झालेली तिवरे गावठाण नळपाणी योजना अतिवृष्टी कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत योजनेचा आज उद्घाटन समारंभ रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा श्री विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.* त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष श्री रोहन बने, चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार श्री शेखर निकम, माजी आमदार श्री सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री बाळा कदम, तालुकाप्रमुख श्री प्रतापराव शिंदे, तालुकाप्रमुख श्री संदिप सावंत, सभापती सौ धनश्री शिंदे, माजी बांधकाम सभापती व विद्यमान जि.प.सदस्य श्री विनोद झगडे, जिल्हा परिषद सदस्य श्री संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.दिप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य श्री राकेश शिंदे, तिवरे सरपंच सौ वैशाली पाचांगणे, तिवरे ग्रामविकास समिती कमिटी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास व सनियंत्रण समिती सदस्य श्री मंगेश शिंदे उपस्थित होते.