कर्नाटक सरकारचा निषेध
शिवरायांचा पुतळा हटविला; चिपळूण राष्ट्रवादीतर्फे निषेध
ओंकार रेळेकर-चिपळूण
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविल्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप आणि कर्नाटक सरकार यांचा निषेध करण्यात आला. कायदेशीर बाबींची पूर्तता करून येत्या आठ दिवसात पुतळा पुन्हा सन्मानाने बसवण्याचा अंतिम निर्णय झाला असल्याचे वृत्त असून ८ दिवसात तसे झाले नाही तर चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, प्रदेश युवक सरचिटणीस डॉ. राकेश चाळके, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, नुरभाई बिजले, सचिन साडविलकर, फिरोज काडवईकर, समीर पवार, संतोष मादगे, नितीन मोरे, मदन चांदे, ऋतुजा चौगुले, शैला पवार, प्रणिता घाटगे, विनय खानविलकर, अमित जाधव, जितेंद्र फुटक, भावेश उतेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.