रेशन दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यास परवानगी द्यावी-अशोकराव कदम
ओंकार रेळेकर-चिपळूण
कोरोना परिस्थितीमुळे शासनाने रेशन दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले होते. यानुसार रेशन दुकानदारांनी रेशनकार्डधारकांना धान्य वितरीत केले. मात्र, आता ग्राहकांचे ठसे घेण्याबाबत पॉस मशिनवर सुचना येत आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून धान्य दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन थेट पावतीद्वारे अथवा धान्य दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरीत करण्यासाठी पुन्हा आदेश करावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे अशोकराव कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
यानुसार सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या अनुषंगाने ज्यावेळी कोरोना विषाणूंचे प्रमाण जिल्ह्यात कमी होते. त्यावेळी दक्षता म्हणून रास्त भाव धान्य दुकानदारांचे अंगठ्याचे ठसे घेऊन ग्राहकांना धान्य वितरण करण्यासंदर्•ाात आदेश निर्गमित केलेले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात धान्य वितरण प्रणाली सुरु होती. परंतू, आजच्या परिस्थितीत पॉस मशिन संबधित एजन्सीधारकांऐवजी त्या ग्राहकांचे ठसे घेण्याबाबत सुचना पॉस मशिनवर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वीपेक्षा कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले आहे व अजूनही वाढतच आहे. त्यामुळे ही सुचना थांबविण्याकरिता व पूर्ववत एजन्सीधारकांचे ठसे घेऊन वितरण प्रणाली चालू राहण्याबाबत संघटनेमार्फत मागणी करण्यात येत आहे.
तसेच कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून शासनामार्फत रेशन दुकानदारांना कोणत्याही संरक्षण साहित्य पुरवलेली नाहीत. किंबहुना त्या प्रकारची कोणती व्यवस्थादेखील नाही. यापूर्वी ज्याप्रमाणे रेशन दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेऊन धान्य वितरण प्रणाली सुरु होती. त्याप्रमाणे वितरण प्रणाली सुरु ठेवणेबाबत आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केली आहे. जेणेकरुन कोरोना विषाणूचे संक्रमण साखळी तोडण्यास मदत होईल व रेशन दुकानदार व ग्राहकांची सुरक्षितता राहील, असे या निवेदनात अशोकराव कदम यांनी नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रशासनासह लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. मात्र, शासन-प्रशासन कोणती •ाुमिका घेणार? याकडे रेशन दुकानदारांचे लक्ष लागले आहे.