माथेरानला विकसनशील पर्यटन क्षेत्र बनवण्यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचा पुढाकार
चंद्रकांत सुतार- माथेरान
माथेरान हे पर्यटन क्षेत्र जगाच्या नकाशावर कायमस्वरूपी झळकत राहावे यासाठी संपूर्ण प्रभागात विकास कामे पूर्ण झाली पाहिजेत.येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधांचा अभाव जाणवू नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यशील नगराध्यक्षा तथा एक उत्तम प्रशासक सौ प्रेरणा प्रसाद सावंत यांनी आपल्या आजवरच्या तीन वर्षाच्या कार्य काळात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले असून आपल्या परीने जे जे शक्य होत आहे त्या कामांचा पाठपुरावा करून संबंधीत अधिकारी वर्ग त्याचप्रमाणें राजकीय वरिष्ठांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.
एमएमआरडीए चे आयुक्त मा. आर.ए.राजीव यांची मुंबई(बांद्रा) येथील कार्यालयात भेट घेऊन माथेरान फिनिक्युलर रेल्वे बनविणे कामी समिती गठीत केल्या बाबतीत तसेच माथेरान येथे सुरू असलेल्या कामामुळे लॉकडाऊनच्या काळात स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाले प्रकरणी नगरपालिकातर्फे अभिनंदन आणि आभाराचे पत्र दिले तसेच नगरपरिषद सभागृहाने आणखी १० प्रेक्षणीय स्थळ विकसित करणे कामी केलेला प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. एमएमआरडीए चे आयुक्त मा. आर.ए.राजीव यांना माथेरान येथे येऊन भेट देण्याची विनंती सुध्दा त्यांंनी केली आहे
यावेळी लवकरच माथेरानला येण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासनही आर.ए.राजीव यांनी
दिले आहे.या भेटीनंतर त्यांनी एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांची भेट घेऊन त्यांना सखाराम तुकाराम पॉईंट आणि रेल्वे लाईनच्या मधील मातीची धूप होणाऱ्या भागास गेबियन वॉल बांधण्यात याव्यात या बाबतीत पत्र देण्यात आले आणि अस्तित्वात असलेली चढण अजून कशी कमी करता येईल याबाबतीतही सूचना करण्यात आल्या.
तसेच एमएमआरडीएच्या टाऊन प्लॅनिंगच्या मुख्य अभियंता मा. उमा यांची देखील भेट घेऊन माथेरान नगरपरिषदेने बी. जे. हॉस्पिटल करिता दाखल केलेल्या 1 करोड 38 लक्षचा प्रस्तावास एमएमआरडीए च्या हेरीटेज समिती कडून निधी लवकर उपलब्ध करण्याबाबतीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या कालावधीत एमएमआरडीए अंतर्गत माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक विकासाची कामे करण्यात येणार असून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे त्याकरिता कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार मा. महेंद्रसेठ थोरवे यांनी विषेश लक्ष केंद्रित केले असून मंत्री महोदय मा. एकनाथ शिंदे यांचे सोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मावळ मतदार संघाचे खासदार मा.अप्प्पासाहेब बारणे यांचे देखील विशेष सहकार्य लाभत आहे.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माननीय पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे यांना माथेरान बाबत विडिओ कॉन्फरन्स घेण्याची विनंती केली आहे ह्या कॉन्फरन्स मुळे निश्चितच अनेक कामे मार्गी लागतील ज्यात वैद्यकीय, शैक्षणिक आणि पर्यटन बाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.यावेळी नगराध्यक्ष परी सावंत यांच्या सोबत नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांसह अन्य मंडळी उपस्थित होते.