नाट्य निर्माता अध्यक्ष पदी संतोष भरत काणेकर,प्रमुख कार्यवाह पदी पुन्हा राहुल भंडारे यांची निवड
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ,मुंबई' या संस्थेची नुकतीच मुदतपूर्व निवड झाली. त्यानुसार, पुढील ५ वर्षांसाठी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -
१) संतोष काणेकर - अध्यक्ष
२) ज्ञानेश महाराव - उपाध्यक्ष
३) राहुल भंडारे - प्रमुख कार्यवाह
४) सुशील आंबेकर - सह कार्यवाह
५) दिनेश पेडणेकर - कोष्याध्यक्ष
६) देवेंद्र पेम - सह कोष्याध्यक्ष
७) संजीवनी जाधव - सदस्य
८) ऐश्वर्या नारकर - सदस्य
९) पद्मजा नलावडे- सदस्य
१०) ऋतुजा चव्हाण-सदस्य
संस्था स्थापनेच्या ५० व्या वर्षात ५ महिला सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश होणे, ही महत्त्वाची बाब आहे.अतिवृष्टी असूनही या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी नाट्य निर्माता संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली.
उपस्थित ज्येष्ठ सदस्यांनी संतोष काणेकर यांचे कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले. या मुदतपूर्व निवडणूक सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य निर्माता प्रदीप कबरे होते. संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून समीर गुप्ते यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली .