Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शरद पवारांच्या उपस्थितीत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या समस्येबाबत बैठक पार...

 शरद पवारांच्या उपस्थितीत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या समस्येबाबत बैठक पार...

महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा - वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण मानेंनी मांडल्या समस्या...

बैठकीला भटक्या जमाती कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित...



महाराष्ट्र मिरर टीम -मुंबई 


 कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा - वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत बैठकीत समस्या अवगत केल्या. 



यावेळी लक्ष्मण माने यांच्या पदाधिकाऱ्यांसह या बैठकीला इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.



आश्रम शाळांतील मूळ अडचण म्हणजे ही मुले दुर्गम डोंगराळ भागातल्या वाड्या-वस्त्या व तांड्यावरची असून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे कठीण आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व शाळा बंद आहेत. परंतु या समाजातील मुलांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन पुरवण्यात येण्यासंबंधात सरकारकडून काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.



सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करावा ही प्रमुख मागणीही या बैठकीत नोंदवण्यात आली. त्याचबरोबर विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणा, थकित वेतन, शिक्षक भरती, परिपोषण अनुदान यासंदर्भातल्या मागण्या शरद पवार यांच्यासमोर अधोरेखित करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies