106 वर्षांच्या आजी आनंदीबाई पाटील झाल्या कोरोना मुक्त
महाराष्ट्र मिरर टीम
नाव- आनंदीबाई पाटील
कोरोनाने अख्खे जग भित्तीच्या छायेत असताना या आजीबाईंचे वय आणि त्यांच्या चेहरयावरील हसू आपल्याला बरेच काही सांगून जातंय. या वयात आजीबाईंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पण जरा पण आजीबाई डगमगल्या नाहीत.हिम्मत हरल्या नाहीत.केडीएमसी कोविड सेंटर मध्ये व्यवस्थित उपचार घेऊन आजीबाई कोरोना मुक्त झाल्या. केडीएमसी कोविड हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.आजीबाई आज सगळ्यांच्या प्रेरणा ठरल्या आहेत.त्यामुळे आपण घाबरून न जाता आजीबाईंसारख आपलं मन घट्ट करून आपणही व्यवस्थित उपचार घेतले तर आपण ही कोविड 19 शी दोन हात करून सहीसलामत आपल्या नातेवाईकांमध्ये परतू शकतो हे मात्र निश्चित.