राज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुप तर्फे तंत्रस्नेही शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांचा सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड 2020 ने सन्मान!
संतोष सुतार-माणगांव
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या राज्यस्तरीय सुजनशील शिक्षक ग्रुपच्या वतीने शैक्षणिक सामाजिक व तंत्रज्ञान विषयक माहितीचे आदान प्रदान केली जाते. या समूहाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा सुपर 30 टीचर्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध तालुक्यातून 30 उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान वैज्ञानिक, साहित्य, क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यामध्ये माणगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका अपर्णा अमोल जंगम यांना सुपर 30 पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.