सुनील गोगटे यांच्या प्रयत्नांना यश
कर्जत - शहापुर 548 अ या रस्त्याची स्वतः कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करत रस्त्यातील त्रुटी लवकरच भरून काढू असे आश्वासन, मुख्य कार्यकारी अभियंता खिस्ते यांनी दिले
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत ते शहापूर मुरबाड या 548 अ रस्त्यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर स्वतः रस्ते महामंडळ कार्यकारी अभियंता खीस्ते यांनी पाहणी केली व त्याचे लेखी स्वरूपात आश्वासन त्यांनी पत्राद्वारे गोगटेना दिले आहे.
कर्जत ते शहापूर मुरबाड या 548 अ रस्त्यासाठी 281 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते परंतु या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. राज कॉटेज येथे पूर्ण कॉंक्रिटीकरण खराब झाले आहे. तसेच कर्जत चार फाटा ते पलसदरी येथील रस्त्याचे खराब काम , तसेच भिसे खिंड येथील आदिवासी वाडी जवळ संरक्षक भिंत नाही, रस्त्याच्या बाजूने जाण्यासाठी गटार नाही, तसेच या रस्त्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या परंतु त्यांना त्याचा योग्य परतावा मिळाला नव्हता , यासाठी मागे कर्जत भाजप चे किसान मोर्चा सरचिटणीस सुनील गोगटे यांनी लेखी निवेदन रस्ते महामंडळ कार्यकारी अभियंता खिस्ते यांच्याकडे दिले होते त्यानुसार 9 तारखेला रस्ते महामंडळ कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते , उप अभियंता सीमा पाटील तसेच टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे अभियंता श्री बेंडसे यांनी कर्जत भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनिल गोगटे यांच्या समवेत क्षेत्रीय पाहणी करून खराब रस्त्याचे पाहणी करत नोंदणी करून घेतली होती. व त्यामुळे पाहणीनंतर पत्रात पी. क्यू. सी पॅनल चे रेक्टिफिशन चे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन खीस्ते यांच्याकडून सुनिल गोगटे यांना देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा मोबदला MMRDA कडून लवकरात लवकर देण्यात येईल असे कार्यकारी अभियंता खिस्ते यांच्याकडून लेखी आल्याने शेतकरी वर्गात आनंद असून सुनिल गोगटे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जाते आहे.