80 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात
हेमंत पाटील कराड
प्रेरणादायी स्टोरी
प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते याचे जीवंत उदाहरण म्हणजे या 82 वर्षीय आजी यांनी कोरोना वर मात करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे त्यामध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचे ही योगदान मोलाचे आहे.
सध्या सातारा जिल्ह्यातील कराड हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. कराड तालुक्याला कोरोनाचे ग्रहण लागल्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कितीतरी जण जगणे विसरून गेले आहेत कोरोनाची ठेच लागल्यामुळे अनेक जण शारिरिक रित्या व मानसिकरित्या कोसळले आहेत त्यांना पुन्हा ताकदीने उभे करण्याचे काम कराडमधील कृष्णा रुग्णालय अत्यंत सेवाभावी या वृत्तीने करत आहे पंधरा दिवसापूर्वी आजींना कोरोना झाल्याचे निदान झाले वय वर्ष 82 असल्याने आजी पुन्हा स्वतः उभा राहतील का या प्रश्नाने कुटुंबाची झोप उडाली असेल
.
आजी कृष्णा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये दाखल झाल्यानंतर आजींवर पहिल्या मिनिटापासून उपचार सुरू झाले डॉक्टर, नर्सेस ,वॉर्डबॉय आजींना बरे करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेऊ लागले आजींचा मुलगा रुग्णालयाच्या बाहेर काळजीने येरझाऱ्या घालत असताना आजी मात्र कृष्णा मधील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये बिनधास्त झाल्या होत्या .सोमवारी आजी ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत त्यांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे या वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना हिमतीने जगण्याची प्रेरणा देऊन आज आजी घरी निघाल्या आहेत डॉक्टर व नर्स यांनी ईश्वर सेवेची शाबासकी देऊन आजी घरी निघाल्या आहेत खरंच कृष्णा हॉस्पिटल एक आरोग्य मंदिरच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून आजी घरी निघाल्या आहेत