कोयना धरण ओव्हरफ्लो
धरणातून प्रतिसेकंद 9 हजार 274 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
हेमंत पाटील -पाटण
.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शिवाजी सागर जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयात 7 हजार 278 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. 105.25 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणातील साठवण क्षमता संपुष्ठात आल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उचलून 7 हजार 174 आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर 2 हजार 100 असा एकूण 9 हजार 274 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आली. आहे