गांधीवादी उद्योगपती
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
एका बाजूला व्यवसाय चालवण्याचे व वाढवण्याचे व्यवधान, दुसऱ्या बाजूला भारतीय तत्वज्ञान व पुराणे यांचा अभ्यास आणि त्याबरोबर महात्मा गांधींच्या चळवळींत सक्रिय सहभाग ही कसरत लीलया सांभाळण्याची दिव्य कसरत ज्यांना जमली, त्यातलेच एक रामकृष्ण बजाज! अशा ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, कार्यकर्ता व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा आज २६ वा स्मृतिदिन.
बजाज कुटुंबाने उद्योगांचे साम्राज्य उभारतानाच देशसेवेचे व्रतही सांभाळले. जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधींबरोबर राहून त्यांची सदैव सेवा केली. गांधीजी त्यांना आपला मुलगाच मानत.
त्यांच्या पुढच्या पिढीतले रामकृष्ण बजाज. त्यांचे थोरले बंधू कमलनयन यांच्या निधनानंतर बजाज उद्योग समुहाची सूत्रे रामकृष्णजींकडे आली.
बजाज उद्योगाचा विकास करतानाच त्यांनी बजाज फाऊंडेशनमार्फत जनसेवा चालूच ठेवली. ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागांत आरोग्य व शिक्षण सुविधा पोहोचण्यावर त्यांनी भर दिला. पुढे हे कार्य त्यांनी राहुल बजाज यांनी पुढे चालू ठेवले.
रामकृष्ण बजाज यांचे आजच्या दिवशी १९९४ साली निधन झाले.
त्यांच्या सेवाभावी स्मृतींस आदरांजली!