भोकरदन -अन्वा रोड बनला मृत्यूचा सापळा?
ज्ञानेश्वर काकडे-भोकरदन
भोकरदन ते अन्वा रोडची अतिशय खराब अवस्था झाल्यामुळे अन्वा ते भोकरदन जाणाऱ्या शेतकरी कामगार तसेच व्यापारी यासारख्या लोकांना दवाखाना व इतर कामे बँक व्यवहार करणे यासारख्या कामांसाठी तालुक्याला जाऊन ही कामे करावी लागतात. या रस्त्याने लोकांना कसरतीचा प्रवास करावा लागत असल्याने कोणत्याही क्षणीअपघात होण्याची दाट शक्यता नाकरता येणार नाही कारण हा रस्ताची अवस्था "खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा,, अशा प्रकारची दयनीय झाली आहे. झाल्यामुळे नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित रस्त्याचे कमीतकमी खड्डे तरी बुजवावे अशी अपेक्षा अन्वा परिसरातील नागरिकांची व्यक्त केली आहे.