जवान सचिन संभाजी जाधव शहीद
प्रतीक मिसाळ-पाटण
सातारा -दुसाळे , तालुका - पाटण येथील जवान सचिन संभाजी जाधव यांना लेह - लडाख येथे भारत - चीन सीमेवर कर्तव्यावर असताना वीरमरण !वीर मरण आलेल्या नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी दुसाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव , रा . दुसाळे , पो . वज्रोशी , ता . पाटण यांना दि . 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीर मरण प्राप्त झाले आहे . त्यांचे पार्थिव विशेष विमानाने दि . 18 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी 10.10 वाजता पुणे येथे पोहचणार आहे . त्यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर 2020 रोजी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सातारा यांनी कळविले आहे .