परिक्षेच्या काळात विद्यार्थांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी भाजपा युवा मोर्चाचे नेटवर्क कंपन्या आणि महावितरणला निवेदन
ओंकार रेळेकर-चिपळूण
संपुर्ण जगामध्ये कोरोना महामारीचे संकट मोठ्या प्रमाणात उभे आहे. राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये गेले ६ महिने बंद आहेत. परंतू माननीय उच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यानुसार या महिन्यापासून ऑनलाईन परिक्षांना सुरवात झालेली आहे. या परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा आणि विज या बाबतीत अडचणी निर्माण होऊ नयेत या साठी आज भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहर च्या वतीने महावितरण कार्यालय चिपळूण आणि चिपळूणातील सर्व नेटवर्क कंपन्यांच्या कार्यालयास निवेदन देऊन विद्यार्थांस सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी भाजपा युवामोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष.संतोष मालप, चिपळूण शहराध्यक्ष सुयश पेठकर, चिपळूण शहर चिटणीस समीर राऊत, प्रणय वाडकर, शरद तेवरे, शुभम पिसे, सुरज पेठकर, वेदांग चितळे, मंदार कदम, शार्दुल साडविलकर आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.