नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्वच्छता मोहीम .
कर्जत मधील स्त्रियांनी एकत्र येत "माझा परिसर स्वच्छ परिसर" चा दिला नारा
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत मध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत भाजपच्या कार्यकर्त्यांनी कर्जत विठ्ठल नगर परिसरात एकत्र येत स्त्रियांनी हातात झाडू घेत साफसफाई केली.
कर्जतमध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं निमित्ताने कर्जत भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत साफसफाई केली. यामध्ये विशेषतः अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला व आपल्या परिसराची स्वच्छता करत माझा परिसर स्वच्छ परिसर चा नारा दिला. मोदींनी दिलेल्या स्वच्छ भारतच्या नाऱ्याला सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या उपस्थित लोकांनी स्वच्छता केली.
या प्रसंगी बोलताना पांडुरंग गरवारे यांनी आपल्या पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत या स्वप्नाची आठवण करून देत आपण सर्वांनी कमीतकमी आपला परिसर स्वच्छ करावा व स्वच्छ भारत चे पंतप्रधान यांचे स्वप्न आपण सर्वांनी साकार करावे, अशी आशा व्यक्त केली . या प्रसंगी कर्जतमधील शोभा मित्रगोत्री, अलका जोशी, शारदा भंगाळे , सोनिया गरवारे, ऋतुजा प्रभुणे, पांडुरंग गरवारे , श्रीकृष्ण जोशी, श्रीखंडे काका , भूषण शिवडेकर, विलास चंदन, सुनिल गोगटे , बळवंत घुमरे स्नेहा गोगटे , शर्वरी कांबळे, सुषमा ढाकणे, मनीषा अथणीकर आणि इतर कार्यकर्ते यांच्यासोबत नगरपालिका सफाई कामगार उपस्थित होते।