Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बोरघाटात उभ्या कारवर ट्रक आदळला,कारचा चेंदामेंदा

 बोरघाटात उभ्या कारवर ट्रक आदळला,कारचा चेंदामेंदा


महाराष्ट्र मिरर टीम खोपोली



आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट पायथ्याशी विचित्र अपघात घडला. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पहिल्या चढाला रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कार वर पुढे उभा असलेला ट्रक उलट येऊन आदळला यात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून सुदैवाने कार मध्ये कोणी व्यक्ती नव्हती.

 मारूती वॅगनर कार घाट पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे समजतंय . रोड पासिंग न झालेली ही कार आहे  .चढावर मालाने भरलेला ट्रक तपासणी साठी थांबविण्यात आला होता .मात्र हॅन्ड ब्रेक न लागल्याने ट्रक उलट दिशेने खाली आला व उभ्या असलेल्या कार व आदळला. यात कार पूर्ण चेपली गेली .खोपोली पोलीस ,खोपोली अपघातग्रस्तांच्या। मदतीला या ग्रुपचे सदस्यव स्थानिक नागरिकांनी क्रेनच्या मदतीने ट्रक पुढे घेतला. या धावपळीत ट्रक ड्रायव्हर भानुदास कोळंबे हे किरकोळ जखमी कळतंय.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies