कृषी विधेयकला विरोध
चिपळूण राष्ट्रवादीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
ओंकार रेळेकर -चिपळूण
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. या विधेयकामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच बाजार समित्या बंद झाल्यास शासनाच्या धोरणानुसार शेतीमालाचा हमीभाव खाजगी कंपनी स्वतःच्या फायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला देईल. यात शेतकरी वर्गावर मोठा अन्याय होणार आहे. या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीतर्फे आज गुरुवारी आमदार शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खाताते, नेते शौकत मुकादम, दादा साळवी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी युवकचे प्रदेश सरचिटणीस डॉ. राकेश चाळके, जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, शिरीष काटकर, रमेश राणे, जागृती शिंदे, दीपिका कोतवडेकर, दिशा दाभोळकर, शमीना परकार, दशरथ दाभोळकर, वात्सल्य शिंदे, सिद्धेश लाड, समीर काझी, खालीद दाभोळकर, किसन चिपळूणकर, इक्बाल मुल्ला, अभिजीत खताते, रियाज खेडकर, निर्मला चिंगळे, सचिन सडविलकर, रमेश चाळके, संदेश गोरिवाले, खालील पटाईत, रोहन इंगावले, मनोज जाधव, सचिन पाटेकर, शहबाज कटमाले, उदय भोजने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.