सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
नगरसेवक अमोल उदयसिंह मोहिते
कुलदीप मोहिते -कराड
दिवसेंदिवस सातारा मधील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे आकडे कमी होण्याचे नाव घेत नाहीत त्यामुळे सातारा येथील जनता प्रचंड दहशतीखाली वावरत आहे जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सातारा ची जनता हैराण आहे त्यामुळे सातारच्या जनतेचा वाली कोण असा प्रश्न सातारकरांना पडलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर सातारचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर
सर्व सामाजिक संघटना व राजकीय संघटना भव्य असा मूकमोर्चा काढणार आहोत असे एका परिपत्रकात सांगितले आहे