अखेर भटक्या कुत्र्यांनी त्याला टिपलंच...माथेरानमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव...
चंद्रकांत सुतार--माथेरान
माथेरानच्या जंगलामध्ये अनेक वन्य जीव आपणास पाहवयास मिळत असतात, सद्या पाऊस परतीच्या मार्गावर असताना निसर्ग सर्वत्र हिरवेगार बहरत आहे, भेकर, कलिंदर, मुंगूस, शेकरू, अन्य वन्य जीवाना सध्या मुबलक खाद्य मिळत आहे, ते माथेरान मध्ये सर्वत्र फिरताना दिसत आहे, अशाच एक भेकरला आज मालडुंगा बंगला मागे कुत्रांनी जीवे मारले,
कोरोना मुळे माथेरान पूर्णपणे बंद असल्याने आता कुठे सुरुवात होत आहे, त्यातच सर्व हॉटेल, दुकाने बंद , डम्पिंग ग्राउंट वरील ओला कचरा बंद झाल्याने भटक्या कुत्र्यांना खाद्याची परवड होऊ लागली आहे, सद्या माथेरान मध्ये सर्वत्रच भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढला आहे, कळपच्या कळप ठीक ठिकाणी असल्याने कधी कोणावर हल्ला करतील सांगता येत नाही, प्रिती हॉटेल रस्त्यालगतं मोठाले माकडांना ही पकडून आपले खाद्य केले आहे,
आज मालडूगा बंगल्या मागील बाजूस एक भेकरला सात ते आठ कुत्र्यांनी मिळून पकडले होते, भेकरचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारीच राहणारे शैलेंद्र दळवी, पांडुरंग चौधरी, गणेश दळवी, उमेश मोरे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तेथे सर्व कुत्रे भेकरावर तुटून पडले होते, कुत्रे तेथून हाकलूनही तेथून बाजूला जात नव्हते भेकराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी उमेश मोरे गणेश शलेंद्र पांडू यांना खुप प्रयत्न करावे लागले , कुत्रे बाजूला गेल्यावर थोडा जीव बाकी असलेल्या भेकराला पाणी पाजले हळद लावली पण शेवटी भेकराने जीव सोडला, एक निष्पाप गरीब जीवाचा अंत झाल्याने तेथे असलेले ह्या सर्वांचेच मन हेलावले , मृत भेकराला मोठा खड्डा करून आपल्याच कंपाउंड मधे व्यवस्थित गाडण्यात आले, जेणे करून पुन्हा कुत्रे उकरून काढू नये,एक चूक चुक मनाला, डोळ्यातील अश्रूंवाटे वाहत राहिली,
माथेरानच्या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा दरवर्षी वाढता आलेख पाहता ,लवकरच ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा, खाद्य कमी झाल्याने हे भटकी कुत्री सद्या गाडलेले घोडे, उकरून काढत आहेत, जिवंत माकड, घरातील कोंबड्या, जंगलातील भेकर यांना लक्ष केले आहेच पण या पुढे नक्की कोणाला आपले खाद्य बनवतील हे येणारा काळच सांगेल.
मागील अनेक दिवसांपासून हे भेकर आमच्या बंगल्याच्या आवारात भिनधास्त फिरत असे, चरत असे रोज सकाळी ठरलेला वेळी ते यायचे, शान्त गवत पाला खाऊन जायचे, त्याला आमची आम्हाला त्याची सवय लागली होती आम्ही समोर असलो तरी ते भीत नसे खूप खूप बरे वाटत असे त्याला पाहायला, आज कुत्रांनी बिचाऱ्या गरीब जीवाला मारले वाईट वाटले , कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा.
भास्कर दळवी--माउंट अरेक बंगला-माळी