गरजु विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप
सुधाकर वाघ-मुरबाड
अमृतेश्वर विविधलक्षी शिक्षण संस्था घोटी या सामाजिक व शैक्षणिक संस्था घोटी मार्फत खोडाळा येथील आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे नगरामध्ये इयत्ता12वीमध्ये शिकत असणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मेजर विठ्ठल बांगर व बांगर हॉस्पिटलचे डॉ. एच. वाय. बांगर व यांचेकडून पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.
या संस्थेचे सभासद संजय इधे यांनी घरी जाऊन गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली. सोबत आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे विचारमंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच महाराष्ट्रचे कार्यकर्ते संजय साळवे व सचिन पाटील, रघुनाथ हमरे, सदानंद हमरे हे उपस्थित होते. जागतिक कन्या दिन असल्याचे औचित्य साधून संजय इधे यांची कन्या सृष्टी हिच्या हस्ते कामिनी संपत गोडे (12 वी सायन्स), भाग्यश्री जगदीश कोथे (12वी सायन्स)या विद्यार्थीनींना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थीनींना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.