राज्यातील पहिलेच ऑनलाइन लाईव्ह दहा दिवशीय डिजिटल लिटरसी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण परिषदा तालुका स्तरावर घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार- चंद्रकला ठोके,प्राचार्य डायट,पनवेल
कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम- श्री भाऊसाहेब थोरात शिक्षणाधिकारी (माध्य.)
संतोष सुतार-माणगांव
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या माध्यमातून व गो.म.वेदक विद्यामंदिर तळा यांचे समनवयातुन सुरु करण्यात आलेले डिजिटल लिटरसी हे प्रशिक्षण लवकरच तालुका पातळीवर शिक्षण परिषदांच्या माध्यमातून सुरू करणार असून सर्व शिक्षकांना तंत्रस्नेही बनून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या तंत्रज्ञानाच्या साह्याने पोहोचणार असल्याची माहिती डाएटच्या *प्राचार्य सौ.चंद्रकला ठोके* यांनी दिली. या डिजिटल लिटरसी दहा दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलत होत्या. हा राज्यातील पहिलाच लाईव्ह ट्रेनिंगचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यादरम्यान रायगड चे शिक्षणाधिकारी(माध्य.) श्री. भाऊसाहेब थोरात, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.श्री.संजय वाघ,अधिव्याख्याता श्री.राजेंद्र लठ्ठे व 500 प्रशिक्षणार्थी शिक्षक यादरम्यान ऑनलाइन उपस्थित होते.अशी माहिती या प्रशिक्षणाचे समन्वयक व गो.म.वेदक विद्यामंदिर तळाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री. विठ्ठल रेणूकर यांनी दिली.
यादरम्यान बोलताना *शिक्षणाधिकारी श्री.थोरात* यांनी "ऑनलाइन शिक्षणातील समस्या दूर करणे,शिक्षण सक्षमीकरणासाठी व नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवून अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे महत्व स्पष्ट केले व भविष्यात देखील हे प्रशिक्षण चालू ठेवावे अशी सूचना केली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी तंत्रस्नेही बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली."
डायट पनवेलचे ज्येष्ठ अधिव्याख्याता *डॉ. श्री.संजय वाघ* यांनी "माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त e-content तयार करून विद्या प्राधिकरण मार्फत ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये सहभाग घेण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षक तयार व्हावेत असे आव्हान शिक्षकांना यावेळी केले".
या दहा दिवसीय प्रशिक्षणादरम्यान श्री.गणेश जाधव परभणी वरून व्हिडिओ एडिटिंग व रेकॉर्डिंग,श्री.नितीन जगताप मुंबई यांनी टेस्ट मोज व श्री गणेश सोलंकर नगर हून सायबर सिक्युरिटी या विषयात शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी सौ.कविता पवार,सौ मनीषा भामरे,श्री.विजय दरेकर व श्री. नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन या प्रशिक्षणाचे समन्वयक श्री.विठ्ठल रेणुकर यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झालेबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत रोडे,उपाध्यक्ष पु.गो.मूळे, सचिव मंगेशशेठ देशमुख,शाळा समिती चेअरमन श्री.महेंद्र कजबजे,मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब धुमाळ यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.
या प्रशिक्षणामधून तंत्रज्ञानाबद्दल प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. भविष्यात देखील सर्व प्रशिक्षणाचे आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला आम्ही पुरेपूर उतरत असून विद्यार्थ्यांपर्यंत e-content तयार करून आम्ही शिक्षण पोहोचवत आहोत. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची संधी डायट ने संपूर्ण राज्यातील शिक्षकांना उपलब्ध करून द्यावी.
नितीन पाटील
कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा.
आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले असून या माध्यमातून आम्ही बनवलेले शैक्षणिक व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. गुगल फॉर्म, टेस्ट मोज याचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतल्या,पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनविले, नवीन तंत्रज्ञान शिकलो यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे व त्यांना ऑनलाइन शिक्षण देणे हे प्रशिक्षणामुळे सहज साध्य झाले.
*सौ मनीषा भामरे*
नवजीवन विद्यामंदिर तळाशेत -इंदापूर.